Menu

Tuesday, May 18, 2021

राधेतच जीवन ...

राधेतच जीवन...

करावे जिच्यासाठी,
डोळे झाकून काही,
ती मी नाही,
कळे आता !!

आटला हा झरा,
विश्वासाचा तुझा,
आश्वासक माझा,
न कोणी उरे !!

माझ्या जीवनाचा,
तू न प्रभारी,
तुझा अधिकारी
दुजा कोणी !!

कृष्ण नाही माझा,
होते आहे जाण,
राधेतच जीवन,
सामावले !! 

रुपाली

No comments:

Post a Comment