मकर संक्रांतीचा सण ..
मकर संक्रांतीस शुभ हे, भास्कराचे संक्रमण,
त्या योगे जीवनी होवो, सुख-क्षणांची उधळण ।। १ ।।
हलव्याचा गोडवा आणि तिळगुळाची स्निग्धता,
गुळपोळीवर तुप, झाली सिध्दता स्वागता ।। २।।
रंगबिरंगी पतंग,होई आकाश शोभीवंत,
'काय s पो' च्या स्वरांनी हो, निनादला आसमंत ।। ३ ।।
तिळगुळ देता - घेता, प्रसन्न मनीचा हो गाभा,
सर्वांच्या जीवनी झळाळो, प्रेम-आपुलकीची आभा ।। ४ ।।
शुभ संक्रमणी लुटावे, निर्व्याज प्रेमाचे हो वाण,
मनामनास जोडणारा, असा हा संक्रांतीचा सण ।। ५ ।।
- रुपाली.
No comments:
Post a Comment