रंग रंगांचे !!
रंग न जाणती जात, भाषा
उत्सवातूनी फुलू दे आशा...
एकात्मतेची !
रंगास ना पडे ,सीमांचे कोडे,
हर भू, हर दिशांत तो उडे,
समानतेने !
रंग लागतो काळ्या गोऱ्या,
आसमंती तो पसरे साऱ्या ,
भेदांपलीकडे !
रंग विसरती भांडणतंटा ,
वाद न विसरे तोच करंटा,
भूवरी या !
रंग देती संदेश हे सारे,
ज्यास उमगती, त्यास प्रियच सारे,
जीवनात या !
रंग जीवनाचा, रंगून जगावा,
हर एक क्षणाचा उत्सव व्हावा,
तुमच्या-माझ्या !!
- ------ रुपाली
No comments:
Post a Comment