Menu

Tuesday, May 18, 2021

नाती

नाती....


ज्यांच्यामुळे...

     मनी आनंद लहरी,

    सुखद क्षणांच्याही सरी,

     मनोविश्व माझे बहरी,

नाती तीच !!


ज्यांच्यामुळे

     मनी फुलतो वसंत,

     समाधानही अनंत,

     माझे क्षण शोभिवंत,

नाती तीच !


ज्यांच्याकरिता

    मन कल्पिते नवनवे,

    शोधी भेट प्रयोजने,

    आठवांनी भरू पावे,

नाती तीच !


ज्यांच्यामुळे 

       चढे कळस कतृत्वास,

       बहर नवे व्यक्तित्वास,

       वाढी लागे आत्मविश्वास,

नाती तीच !


ज्यांच्यासंगे

      आपल्या विचारांचा सन्मान,

      आवडी निवडीचाही मान,

       व्यक्तिस्वातंत्र्याचे ही भान,

नाती तीच !


ज्यांच्या सोबतीचा

      मज वाटतो हव्यास,

     मनी आठवांचा सुवास,

     मज हृदयामध्ये वास,

नाती तीच !


माझ्यासाठी,

       अशी कित्येक भवती,

       मनःचक्षू ही बघती,

       मना रुजती, वाढती,

नाती तीच !


- रुपाली

No comments:

Post a Comment