मन आरसपाणी...
गढुळल्या डबक्यात दिसती,
मळभाचेच तवंग,
स्वच्छ, मोकळ्या जळात उमटती,
सृजनाचेच तरंग 🌱🌿!
करावे मन आरसपाणी,
आणि इतुके निर्मळ,
सामावून घ्या, सृष्टीस रे साऱ्या,
सांगतसे का हे जळ ?
ईश्वरनिर्मित हर एक रचना,
दिसते अशी उत्कट,
दावितसे आपुल्या जीवनास,
उद्याची नवीन वाट 🍃☘️ !!
- रुपाली.
No comments:
Post a Comment