SWS अर्थवाणी - चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund )
आपत्कालीन परिस्थिती येते, 😞
दत्त म्ह्णून उभी रहाते, 😨
शारिरीक, मानसिक आणिक आर्थिक, 💰
पातळींवरती ताणून धरते 😖 ।। १ ।।
पूर, भूकंप.सुनामी, मृत्युसम,🆘
संकटे कधी येती नैसर्गिक,🌊
घडे चोरी, अपघात,आजारपण. 😷
अगदीच अगतिक होतो आपण 😟 ।। २ ।।
होतो खर्च आपत्कालीन, 💰
गड्बडते आर्थिक नियोजन, 📉
विशेष हेतुस्तव जपलेली, 👨🎓
पुंजी खर्ची घालतो आपण 0⃣ ।। ३ ।।
का न करावे थोडे नियोजन ? 🛄
आपत्कालीन निधी उभारून, 💰
सहा महिन्यांचे आपुले वेतन , 💸
ठेवावे बाजूला सारून 💰।। ४ ।।
आजारपणी ठरतो सहाय्यक, 🩼
आरोग्य विमा तो उपकारक,🏥
रुग्नालयीण खर्चांची जावक, 💵
मग न वाटतसे जाचक 🙂।। ५ ।।
उत्पन्न बंद होई नोकरी जाता,🥹
खर्चाना न तुम्ही थांबवू शकता, 💸
बचत पुंजी संपे पाहता पाहता, 💰
टळे हे सर्व, योग्य नियोजन करता ।। ६ ।। 📈
घर कर्त्याच्या मृत्यू समयी,😔
आर्थिक संकटे दुःखदायी ,😣
आपत्कालीन निधी फलदायी, 💰
अशा प्रसंगी जरूर होई 🙂 ।। ७ ।।
न कोणाच्या येवो जीवनी, 😇
संकटदायी अशी कहाणी , 🙂
सर्वांसाठी होवो कल्याणी, 😇
अशी ही SWS अर्थवाणी 😇 ।। ८ ।।
No comments:
Post a Comment